पावसाळा सुरु झाला म्हणजे मन कसं प्रसन्न होते, मातीचा सुगंध, हवेतील गारवा, गरम गरम चहा आणि  भजी (तळलेले पदार्थ)… वा… कसा छान बेत जमतो. अहो पण कधी विचार केलात, भजीच का? श्रिखंड, बासूंदी, ताक, अगदी आईस्क्रिम का नाहि, खावेसे वाटत आपल्याला? सांगते, आपल्या शास्त्रात म्हणजे (आयुर्वेदात)  ह्या सगळ्याची शास्त्रशुद्ध उत्तरे आहेत. आयुर्वेद हे फक्त व्याधी उपचाराचे नाही  तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. सद्वृत्त, दिनचर्या, ऋतुचर्या, स्वास्थ्य, आरोग्य आणि दिर्घायुष्य  कमावण्याचे साधन आहे. प्रत्येक ऋतुच्या गुणधर्मानुसार, आपला आहार विहार बदलत असतो, व परीणामतः शारीरिक दोषांमधे देखिल बदल होतच असतात. एकूण ६ ऋतु, त्यांचे गुणधर्म,त्याचा शरीर दोषांवर होणारा परीणाम आणि त्या अनुषंगाने पाळावयाची  ऋतुचर्या, पुन्हा कधीतरी सविस्तर बघु.

वर्षा ऋतु, आणि त्याच्या अगोदर असणारा ऋुतु म्हणजे, ग्रीष्म ऋतु (उन्हाळा). ह्या ऋतुमधे अत्यूष्ण, तीक्ष्ण, गुणांमुळे वात दोषाचा संचय होतो. पावसामुळे वातावरणात वाढलेल्या गारठ्याचि संचित वात दोषाला जोड मिळते आणि वात दोषाचा प्रकोप होतो. आता हया मुळच्या शीत आणि रुक्ष वात दोषाला शांत  करणार कोण?  तर उष्ण(गरम) अणि स्निग्ध असे तेल; म्हणूनच गरमागरम तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा शरीर व्यक्त करत असते. आहे कि नाही आपल्या शरिराचे हायटेक मेकँनिजम ?

हा प्रकुपित वात पुढे सांधेदुखी, कंबरदुखी, अंगदुखी इ. वातविकारांना बळ देतो, हाच प्रकुपित वात पित्त  दोषाच्या साहचर्याने शितपित्त(आंगावर पित्ताच्या गांधी उठणे), अॅसिडिटि होणे, अजीर्णासारखे व्याधि  उत्पन्न करतो. पावसाळ्यात जठराग्नि (पचन शक्ति) मुळातच दुर्बल असतो आणि निसर्गतः वात दोषाचा प्रकोप, हया सगळ्यावर उपाय म्हणून अयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे वर्षा ऋतुचर्येचे पालन करावे. पचण्यास हलके, ताजे आणि गरम अन्न खावे. तेल तुपाचा योग्य प्रमाणात  आहारात वापर करावा. https://www.ayurvedalive.in/the-monsoon-health-care

ह्या सगळ्या तक्रारींवर उपाय म्हणून आणि त्याखेरीज स्वास्थ व्यक्तिंनीदेखिल आरोग्य टिकवण्यासाठी व वातविकार टाळण्यासाठी पावसाळ्यात बस्ति कर्म (पंचकर्मातील एक ऊपक्रम) करूनच घ्यावे. आयुर्वेदतात ऋतुनुसार पंचकर्माचे(शोधन कर्म) वर्णन केले आहे. त्यातील एक म्हणजे वर्षा ऋतु मधे बस्ति.

 

 

बस्ति महात्म्य  :

ग्रंथात बस्तिचे वर्णन अर्ध चिकित्सा म्हणुन व प्रसंगी पूर्ण चिकित्सा असे आहे.

हे आणि अश्या बर्‍याच फायद्यांनी बस्ति आपल्या शरिरास उपकृत करते. मग कसला विचार करताय? ह्या पावसाळ्यात तुमच्या जवळच्या आयर्वेदिक दवाखान्यात जाउन वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार बस्ति घ्या आणि वात विकारांना अलविदा करा….