images-1-e1494252351200
Share on twitter
Tweet
Share on pinterest
Pinterest
Share on email
Email
images-1-e1494252351200

“रिअल हर्बल”

images (1)परवा आम्ही जुन्या मैत्रीणी लंचसाठी भेटलो होतो, जेवण झाल्यावर छान गप्पा मारु म्हटलं तर एक जण म्हणाली, “अग नाही मी नीघते, माझी ४ वाजता पारलर मधे अपाँइंटमेंट आहे.”  मी म्हणाले, “अगं एवढं काय? जा कधीतरी नंतर, आज राहू दे ना.” त्यावार मलाच म्हणाली, “तुला काय माहिती, तुझं बरं आहे बाबा, तुझा चेहरा छान क्लिन अहे, आमच तसं नाही ना”.

खरच खूप डाग होते तीच्या चेहर्‍यावर, त्वचा पण रुक्ष आणि निर्जीव दिसत होती. असं का झालं विचारल्यावर नाराजिनेच  म्हणाली,”काही माहित नाही गं, तरी मी रेग्युलरली क्लिन अप आणि फेशियल करुन घेत असते”. मी म्हणाले,”अगं वेडे सारखं सारखं, त्या केमिकल्स ने स्किन अजुन खराब नाहि का होणार?” त्यावर मलाच म्हणाली, “मी अजिबात केमिकल बेस्ड प्रोडक्टस् नाहि वापरत बरं, फक्त हर्बल आणि आयुर्वेदिक प्रोडक्टसच वापरते. मला जरा हसायलाच आलं, “आयुर्वेदिक आणि हर्बल म्हणजे नेमकं काय गं?”,मी विचारलं? मला म्हणाली,”अस काय ग करतेस? तू आयुर्वेदिक डॉक्टर आहेस ना? हर्बल क्रिम्स, स्क्रब्स, लोशन्स, पॅक्स असतात”.

मी म्हणाले, “जरा बस  इथे, अगं आयुर्वेदिक/हर्बल क्रिम्स, लोशन्स, ई़. चा बेस मूळतः केमिकल्सचाच असतो, त्यात फक्त नावापुरता थोडी हर्बल एक्सट्रॅक्टस आणि एसेन्स असतात, आणि ते देखिल प्रोसेस्ड. अगं एखाद्या सूप मधे चिमुटभर मिरपूड टलकल्याने, तो Pepper soup नाही होत ना? अगदी तसंच आहे ह्या प्रोडक्टसच सुद्धा असतं.आता तूच विचार कर, ह्यात तूला किती हर्बल ईफेक्ट्स मिळणार? आणि तुझा प्राॅब्लेम किती  क्युअर होणार? त्या पॅक्स आणि क्रिम्समुळे थोडा काळ स्किन छान क्लिन आणि फ्रेश राहते, पण त्यामुळे होणारे दुष्परीणाम काही टळत नाही.”

एव्हाना हे सगळं ऐकुन ती बावचऴी होती, तिच्या ‘सो कॉल्ड – हर्बलच्या’ भ्रमाचा भोपळा आता फुटला होता. आता मी सांगत होते आणि ति कुतुहलाने ऐकत होती. “अगं जेव्हा त्वचेशी निगडीत कुठलेहि वैगुण्य उत्पन्न होते, तेव्हा त्याचा संबंध थेट रक्त धातु अन् आपल्या पचन संस्थेशी असतो, आणि त्यातला बिघाड   दुरुस्त केल्याशिवाय कायमचा गुण नाही मिळत बरं. नुस्तं वर वर लेप लावून रुप उजळत नाही, आतुन स्वछता मोहिमेची सुरुवात करावी लागते हं.   आपल्या आहार, विहारात्मक बाबींची देखील योग्य काळजी घ्यावी लागते, आणि ह्यच्या जोडिला जेव्हा बाह्योपचाराची साथ मिळते, तेव्हा सोने पे सुहागा.”

“तुला हर्बल/आयुर्वेदिक स्किन केअर पाहिजे ना? मग आपल्या किचनच्या खजिन्यात अाहेत ना. ताजी फळ, भाज्या, त्यांचे रस, वनस्पतिज चूर्ण, दुध, तूप, मध,इ. फक्त त्याचं योग्य ज्ञान आणि उपयोग करुन फेस क्लिन अप, स्किनग्लो, स्किन टायटनिंग इफेक्टस, चेहर्‍यावरचे डाग,वांग घालवून नितळ त्वचा मिळवता येते. आपल्याला हे माहित नसल्यास तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्यावा, किंवा क्लिनिक्स मधे ट्रिटमेंटस   करुन  घ्याव्या. आपल्या आज्या कुठे वापरत होत्या गं, ह्या सर्व क्रिम्स अन् लोशन्स ? घरगुती उपचार, आणि छान दुध, तूप व पौष्टिक आहार घ्यायच्या, आणि त्यामुळेच किती सुंदर दिसायच्या त्या?

आपल्या किचन मधील कोरफड, बटाटा, गाजर, मध, पपई, चिकू, काकडी, दही व  हळद, चंदन, मुलतानी माती, निम्ब, त्रिफळा, तुळस,  असे काही नैसर्गिक औषधी वनस्पतिज चूर्ण वापरुन खूप छान रीजल्ट्स मिळतात. कधी करुन तर बघ, विसरुन जाशील पार्लर वगैरे सगळं. जे चेहर्‍याच्या सौंदर्य प्रसाधनां बाबत, तेच केसांच्या देखिल.” हे सगळं ऐकल्यावर ती चकित झाली, म्हणाली,”खरंच हे इतकं सेफ, इजी आणि इफेक्टिव्ह आहे? ठरलं तर आता, आजपासून “रिअल हर्बल” थेरपी आणि प्रोडक्टस  वापरणार.

काय सांगता? तुम्ही देखिल ह्या हर्बलच्या फसव्या जाळ्यात अडकला होतात? असो, पण अजून वेळ गेली नाही, वेक अप न गो फॉर “रिअल हर्बल”, आणि तुमचं सौंदर्य दिवसेंदिवस खुलवत ठेवा.

तुमच्या काहि शंका असल्यास आम्हाला नि:संकोचपणे संपर्क करा.

“सेव्हन आयुर्वेद केअर”, कर्वे रोड, कोथरुड.

दुरध्वनि : ०२०-२५४४२६४६/ ८८८८०३२०७३.

www.sevenayurveda.com

www.ayurvedalive.in

Category -
Your next read -
Founder of Seven Ayurveda
Share on twitter
Tweet
Share on pinterest
Pinterest
Share on email
Email
Share on twitter
Share on pinterest
Share on email

Subscribe to our Newsletter

Join our newsletter to get our insights before anyone else.

Related Blogs

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt