काहि दिवसांपूर्वी दवाखान्यात एक कॉलेजकुमारी आली, बराच वेळ बसावं लागल्यामुळे क्लिनिक मधील गोष्टी निहाळत बसली होती.  भेटल्यावर तिचा पहिला प्रश्न असा होता, “अय्या डॉक्टर तुम्ही हे दंतमंजन का ठेवलं आहे?, किती ओल्ड फँश्नड आहे ते, हल्ली कोणीतरी वापरतं का हे ?”

मी तीला म्हटलं, ” अगं का नाही?, पूर्वी आपले आजी, आजोबा निम्ब, बकुळ, बाभूळ, खैर इ. ह्याच्या काड्या किंवा चूर्ण नाही वापरायचे का? एवढंच कशाला, काहिच नसलं तर चूलितील राख किंवा मीठाने देखील दात घासायचे. त्यांना कधी, दात दुखणे, किडणे, सेन्सिटिवीटिचे प्रॉब्लेम होते का गं?”

 दंतमंजन किंवा दन्तधावन हे शब्द आजकाल आपल्या शब्दकोषातून जणू गायबच झाले आहेत,  आणि त्यांची जागा घेतली आहे अकर्षक जाहिरातीद्वारे प्रचलित – रंगीत, जेल युक्त, चमकणारया फ्लेवर्ड तुथपेस्टने. आपण त्या जाहिराती आणि त्यातील दिखाव्यावर एवढे भारावून जातो, की त्यातील काय आणि कितपत  खरं अहे, तयाचे दुष्परीणाम, ह्याकडे दुर्लक्ष करतो. ती गुळगुळीत पेस्ट, खरंच आपले दात मजबूत  बनवते? दातांवरचा चिकटपणा खरडून काढते का? त्यातील घटक द्रव्य किती सुरक्षित आहेत?, त्यात लवंग, निम्ब, इ. चा अर्क/वनस्पती आहेत कि नुस्ता एसेन्स. लहान मुलांनी अथवा आपण हि पेस्ट गिळली असता, त्याचा किती अपाय होतो, ह्याचा आपण विचार सुद्धा करत नाही.

आपल्या हिरड्या, रक्त आणि मांस धातुंपासून बनलेल्या असतात आणि दात अस्थि धातूचा मल आहे. अापण केलेला आहार, दातांची स्वच्छता ह्यावर आपल्या दातांचे आरोग्य टिकून  असते. आयुर्वेदात दन्तधावन म्हणजेच दात घासण्यासाठी कडू, तिखट आणि तुरट रसांची औषधी वनस्पती चूर्ण किंवा काड्या वापरण्यास सांगितल्या आहेत.

कडूनिम्ब, खैर, बाभुळ, गुळवेल, अर्जुन, जांभूळ, करंज, कापूर, लवंग, बकुळ, हळद इ. सर्व औषधी हि कडू, तिखट आणि तुरट रस  प्रधान तर आहेतच, पण त्याच बरोबर कृमिनाशक, क्लेदघ्न, मुखदुर्गंधी दूर करणारी आणि दंतवेष्ट व मांस (हिरड्या) मजबूत करणारी आहेत.

दात आणि हिरड्यांमधे होणारे इन्फेक्शन्स, रक्त, पू वाहणे, दात दुखणे सुद्धा ह्या औषधांमुळे टाळले जाते. ह्यातील तुरट रसामुळे हिरड्या घट्ट राहतात, कृमिघ्न आणि क्लेदनाशक गुणांमुळे  दात किडणे, मुखदुर्गंधी देखिल दूर राहते, तसेच तोंडामधे स्वच्छपणा जाणवतो, – केमिकल युक्त गार्गल लिक्विड्स वापरारवे लागत नाहित. अधुन मधुन आपल्या बोटाने मंजन केले असता, हिरड्यांना मसाज होतो व तेथील रक्तसंचरण देखील सुधरते.

सर्वात महत्वाचे म्हणजे दात घासताना ह्याचा रस चूकुन पोटात गेला असता काहिहि हानी होत नाही.

हे सगळं ऐकल्यावर ती म्हणाली, “सॉरी हं डॉक्टर, खरंच आऊटडेटेड वाटणारे हे दंतमंजन किती गुणकारी आहे, हे मला आणि माझ्या सारख्या कितीतरी जणांना माहितीच नाही. आता उद्यापासून तुथपेस्टला BYE-BYE.”

मग आता तुम्ही कसला विचार करताय ? वापरणार ना दंतमंजन ?